आता बसची पाहू नका वाट! ‘बेस्ट’चं लोकेशन तुमच्या हातात!

84

मुंबईत प्रवास करणे आता अधिक सोयीचे होणार आहे. आजवर रेल्वेची वेळ पाहणे, तिकिट काढण्यासाठी अ‍ॅपची सुविधा होती. परंतु आता बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकिट काढणे, पास काढणे अगदीच सोयीस्कर होणार आहे. बेस्ट बसला याकरिता ‘चलो अ‍ॅपची’ साथ मिळणार आहे. यापूर्वीही बेस्टचा प्रवास हा अ‍ॅप अस्तित्वात होता पण त्याला तांत्रिक कारणास्तव म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी चलो अ‍ॅपचे अनावरण केले व हे अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. यामुळे मुंबईकरांना अनेक सुविधा प्राप्त होणार असून घरबसल्या आपली बस कुठे आहे हे सुद्धा ट्रॅक करता येणार आहे.

२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रिक 

हा प्रकल्प बेस्ट (BEST) अंतर्गत चलो या भारतातील आघाडीच्या वाहतूक तंत्रज्ञान कंपनीने राबविला आहे. अ‍ॅपच्या लॉन्चिंगवेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “साधारणपणे मी परदेशात गेल्यावर त्या देशांच्या सार्वजनिक वाहतुकीची तुलना आपल्याशी करतो आणि या अ‍ॅपद्वारे आपल्या शहरातील लोकांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल.” ते म्हणाले की 2027 पर्यंत शहरातील 100 टक्के बेस्ट बसेस इलेक्ट्रिक असतील आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल.

सुपर सेव्हर कार्ड योजना

चलो सुपर सेव्हर योजना तुम्हाला तुमच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यास मदत करतात. सुपर सेव्हर योजना चलो कार्ड आणि चलो अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. तुमच्या सोबत तुम्ही हे स्मार्ट कार्ड कायम बाळगू शकता. यात वेळोवेळी पैसे भरून रिचार्ज करणे गरजेचे आहे.

अधिक पर्याय – 72 वेगवेगळ्या प्लॅनसह, प्रवासी त्यांना सर्वात योग्य अशा योजनेची निवड करतात.
अधिक बचत – प्रति ट्रिप ₹ १.९९ इतके कमी दर आहेत.

( हेही वाचा : टॅक्सीसाठी हात दाखवताय, पण ती रिकामी आहे का? आता सहज समजणार…)

महिला प्रवासी सुरक्षेवर भर 

अ‍ॅपमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर दिला जाणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत अ‍ॅपमधील बटण दाबताच त्याची माहिती बेस्टसह पोलीस नियंत्रण कक्षाला मिळेल आणि तात्काळ महिला प्रवाशांना मदत मिळणार आहे. जानेवारी अखेरीस ही सुविधा अ‍ॅपद्वारे महिला प्रवाशांना मिळेल. तसेच तेजस्विनी बसही चालवण्यात येतात. त्यात वाढ करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.