४ ते ६ मार्च दरम्यान राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ४ ते ६ मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कडाक्याचे ऊन पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असतानाच आता हवामान विभागाने राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

( हेही वाचा : भाजपने टिळक आणि पर्रीकरांचा वापर करून फेकले – उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल)

४ ते ६ मार्च दरम्यान पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ४ ते ६ मार्च या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

५ मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो तसेच विदर्भात सहा मार्चला सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा २-३ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात जेवढी थंडी होती त्याहून जास्त तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी यंदा उन्हाळ्यात तापमान उच्चांकावर पोहोचलेले दिसेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील ५ दिवसांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य-पूर्व भारतामध्ये कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here