Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले

तुम्ही आंदोलन करत आहात कि युद्धाला जात आहात, तुमच्या नेत्यांना अटक झाली पाहिजे, असे न्यायालयाने शेतकऱ्यांना फटकारले.

262

शेतकरी आंदोलनावरील (Farmer Protest) याचिकेवर चंदीगड उच्च न्यायालयात गुरुवारी, ७ मार्च रोजी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना चांगलेच फटकारले. वास्तविक, हरियाणा सरकारने उच्च न्यायालयात काही आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी हातामध्ये तलवार घेतलेले फोटो दाखवले. हे फोटो पाहून उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. हातात तलवारी घेऊन  कोणी आंदोलन करते का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले.

आंदोलन करताय की युद्धाला जाताय?

मुलांच्या पाठीमागून हे आंदोलन (Farmer Protest) करत आहात, त्यांच्या हातात हत्यारे देत आहात. निर्दोष आणि भोळ्या भाबड्यांना तुम्ही पुढे करत स्वतःचे इस्पित साध्य करत आहात, तुम्हाला इथे उभे राहण्याचाही अधिकार नाही. तुम्ही आंदोलन करत आहात कि युद्धाला जात आहात, तुमच्या नेत्यांना अटक झाली पाहिजे, असे न्यायालयाने शेतकऱ्यांना फटकारले.

(हेही वाचा Jaunpur : जौनपूरमध्ये मुंबईचा बाहुबली जिंकणार की जौनपूरचा? कृपाशंकर सिंह यांच्यासाठी निवडणूक का नाही सोपी?)

पंजाब आणि हरियाणा सरकारलाही फटकारले

या काळात उच्च न्यायालयाने हरियाणा आणि पंजाब सरकारलाही फटकारले. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही राज्ये आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शेतकरी शुभकरन यांच्या मृत्यूची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. आंदोलन (Farmer Protest) शांततापूर्ण असल्याचे सांगणाऱ्या वकिलांना न्यायालयाने फटकारले आणि म्हटले, येथे उभे राहून बोलणे खूप सोपे आहे. न्यायालयाने वकिलांना विचारले, पटियालाची घटना विसरलात का? जेव्हा तिथे एका पोलिस अधिकाऱ्याचा हात कापला गेला. उच्च न्यायालयाने वकिलांना विचारले की, हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतात?

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.