![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-05T181110.992-696x377.webp)
-
प्रतिनिधी
पुणे शहरातील वाढती वाहतूककोंडी आणि अपुऱ्या रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंकसाठी आवश्यक निधी देण्याची मागणी त्यांनी केली.
पुण्याच्या रस्त्यांसाठी मोठ्या निधीची गरज
पुणे शहराच्या जलद वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या ‘मिशन १५’ प्रकल्पांतर्गत ३३ पैकी १५ प्रमुख रस्त्यांचा विकास हाती घेण्यात आला आहे. या योजनेसाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघासाठी ३२५ कोटी रुपयांची गरज आहे. यातील १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.
(हेही वाचा – देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींवर कारवाई होणारच; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)
उपमुख्यमंत्री अजित पवारांची सकारात्मक भूमिका
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या रस्ते विकासासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले.
विकासकामांना गती देणार – चंद्रकांत पाटील
पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनात बदल होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले.
भाजपा सरकार पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध
“पुणेकरांना दर्जेदार वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. येत्या काळात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या सर्व प्रकल्पांना गती दिली जाईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community