गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांच्या (Chandrapur Accident) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अधिक माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात काल म्हणजेच बुधवार, २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्याने भीषण अपघात (Chandrapur Accident) घडला. या अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्याच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
(हेही वाचा – Forest Minister : कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण न होण्यासाठी कडक पावलं उचला…! वनमंत्र्यांचे सक्त निर्देश)
शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर हा अपघात (Chandrapur Accident) घडला. या अपघातातील मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृतांची नावे आहेत.
असा झाला अपघात…
शहरातील अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन एक ट्रक भरधाव वेगात येत होता. परंतु वेगामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर (Chandrapur Accident) उलटला. ट्रकखाली चिरडलं गेल्याने ऑटोतील चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ज्यात रिक्षाचालकाचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community