Chandrapur Monsoon Update: चंद्रपूरमध्ये पावसाचा रुद्रावतार! शेकडो घरे पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत 

146
Chandrapur Monsoon Update: चंद्रपूरमध्ये पावसाचा रुद्रावतार! शेकडो घरे पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत 
Chandrapur Monsoon Update: चंद्रपूरमध्ये पावसाचा रुद्रावतार! शेकडो घरे पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत 

मुंबईसह राज्यात मागील काही दिवसांपासून, मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र शहरासह खेड्यापाड्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र चंद्रपुर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी या नद्यांना पूर आला. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील (Flooding of Chandrapur rivers) चिचपल्ली येथील मामा तलावाची (Mama Talav, Chadrapur) पाळ फुटल्याने सुमारे ३०० घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.  (Chandrapur Monsoon Update)

(हेही वाचा – Amit Shah पुण्यात! भाजपाच्या महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शहा फुंकणार विधानसभेचे रणशिंग)

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील एक नवीन डांबरी रस्ता वाहून गेला. मूल तालुक्यातील अंधारी नदीला पूर आल्याने चंद्रपूर-मूल, जानाळा-सुशी, मूल-करवन, मूल सावली, राजोली – पेटगाव मार्ग बंद झाले आहे. मूलमधील रामपूर वॉर्डात पुराचे पाणी शिरल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. (Chandrapur Monsoon Update)

(हेही वाचा – Kedarnath Landslide: केदारनाथमध्ये घडली दुर्घटना! दरड कोसळून ३ भविकांचा मृत्यू, अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती )

ब्रह्मपुरी तालुक्यातील दूधवाही रेल्वेच्या अंडरपास पुलामध्ये पाणी, नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चंद्रपूर तालुक्यात वर्धा नदीवरील धानोरा नजीकच्या पुलावर पाणी,  चंद्रपूर – भोयेगाव ते गडचांदूर तसेच कोरपना मार्ग बंद झाला आहे. मूल तालुक्यातील उमा नदीला पूर, मूल- ब्रह्मपुरी मार्गही बंद झाला आहे. रात्रभर संततधार पाऊस झाल्याने वर्धा नदीला पूर. वरोरा – वडकी मार्ग बंद झाला आहे. मूल तालुक्यातील अंधारी नदीच्या पुराचे पाणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतात. पोंभुर्णा-वेळवा व थेरगाव मार्ग बंद. सिंदेवाही तालुक्यात जामसळा नदीला पूर आल्याने जुना जामसळा गावात पाणी शिरले. सिंदेवाही तालुक्यातील पांढरवाणी येथील तलावाची पाळ फुटली असून तलावातील पाणी वाहून गेले.  (Chandrapur Monsoon Update)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.