Chandrapur: दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होणार

27 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील.

173
Chandrapur: दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होणार

उपप्रादेशिक परिवहन कर्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एम.एच. -३४, CJ-०००१ते एम.एच.-३४,सीजे-९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांनी परिवहन कार्यालयात 26 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. (Chandrapur)

तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्क ( DD उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे नावे ) विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. सदर मालिका चालु असतांना वाहन 4.0 प्रणाली कार्यान्वित झाल्यांनतर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नविन मालिका दिनांक 27 मार्च 2024 पासून सुरू करण्यात येईल.

(हेही वाचा – Holi Festival 2024 : यंदा बाजारात आल्या मोटू पतलू, बार्बी, स्पायडर मॅनच्या पिचकारी )

प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4 वाजेपर्यंत स्विकारले जातील व 26 मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील. 27 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.