चंद्रशेखर आगाशे (Chandrasekhar Agashe) यांचा जन्म महाराष्ट्रातील भोर ठिकाणी वेल्हे गावात १४ फेब्रुवारी १८८८ साली एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब परंपरागत सावकारी करायचे. त्यांचे वडील मुख्य न्यायाधीश म्हणून काम करायचे. त्यांची आई कल्याणच्या सुसंस्कृत बापट कुटुंबातल्या होत्या. १८९९ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते फक्त अकरा वर्षांचे होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांनी त्यांची मालमत्ता बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली आणि त्यांच्या कुटूंबाला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा चंद्रशेखर आगाशे यांच्या आई १९०० साली आपल्या मुलांना घेऊन पुण्यातील शनिवारपेठ या ठिकाणी आपल्या माहेरी गेल्या.
तिथे आगाशे यांनी भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवली आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू लागले. पुढे चंद्रशेखर आगाशे यांनी वयाच्या सतराव्या वर्षी मॅट्रिकचे शिक्षण घेण्यासाठी नूतन मराठी विद्यालयात दाखला घेतला. त्यानंतर पुढे त्यांनी १९१४ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळवली. त्यावेळी त्यांचे वय सव्वीस होते.
१९१४ ते १९१७ सालपर्यंत त्यांनी पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात गणित विषयाचे शिक्षक म्हणून काम केले. १९१७ सालानंतर आगाशे हे कराची येथील एका कॉन्व्हेंट शाळेत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करायला लागले. त्यादरम्यान ते एक शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही मुंबईत कार्यरत होते. १९१९ साली त्यांनी मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातुन एल.एल.बी. ही पदवी मिळवली आणि ते पुण्यात येऊन वकिलीची प्रॅक्टिस करायला लागले. १९२० ते १९३२ च्या दरम्यान आगाशे हे भोरचे दहावे राजे शंकरराव चिमाजीराव यांच्या दरबारात मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते.
अनेक क्रांतीकारकांना स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पाठिंबा
आगाशे यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतीकारकांना सहकार्य करुन मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासोबत अनेक क्रांतीकारकांना स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पाठिंबा दिला. १९३० सालच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी त्यांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध दंगली करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले होते.
चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन
१९३२ साली त्यांनी भोर राज्य परिषदेचे सचिव म्हणून काम सांभाळले तसेच ते संस्थांनी भारत या दैनिकाचे संपादकही होते. या दैनिकात ते लेखही लिहायचे. चंद्रशेखर आगाशे एक उद्योगपतीही होते. त्यांनी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली होती. ९ जून १९५६ साली चंद्रशेखर आगाशे त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा व्यवसाय उत्तमप्रकारे सांभाळला. पुण्यामध्ये त्यांच्या नावाचे ‘चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन’ हे कॉलेज आहे तसेच चंद्रशेखर आगाशे यांचे नाव पुण्यातील एका रस्त्यालाही दिला गेले आहे.
हेही पहा –
—
Join Our WhatsApp Community