Chandrashekhar Bawankule यांच्या ‘त्या’ विधनाने राजकीय क्षेत्रात खळबळ; नेमके काय म्हणाले…

148

राज्यात विधानसभा निवडणूकीत (Assembly Election 2024) महायुतीला एकूण २३० जागा जिंकून वेगळाच विक्रमक रचला आहे. भाजपाच्या (BJP) आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातील राजकारणात त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या ह्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे, भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रचंड आत्मविश्वास या विजयानंतर वाढला आहे. दरम्यान, नाशिक (Nashik Chandrashekhar Bawankule) येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पुढील विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. (Chandrashekhar Bawankule)

नाशिक येथे महायुतीच्या १४ पैकी १४ जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे नाशिकमध्ये रविवार ०१ डिसेंबर रोजी आले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पक्ष संघटनेची बैठक घेतली पाहिजे म्हणून मी नाशिकला आलो. मी ठरवले होते रविवारी नाशिकला आलोच आहे तर प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणार. दरम्यान भेट घेतली असतं चंद्रशेखर बावणकुले म्हणाले की, २०२९ ची विधानसभा (2029 Assembly Elections) जिंकण्याची तयारी आजपासूनच करा, तसेच तयारीला लागा, असा आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रसशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

(हेही वाचा – Fort : गड दुर्गांचे धारकरी व्हा; ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचे तरुणांना आवाहन)

पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपण लोकसभेत प्रत्येकी बूथवर २० मतदान कमी घेतले म्हणून कमी पडलो, उशिरा पण आपला खरा विजय झाला. आपण ही लढाई स्वतः म्हणून लढलो आणि जिंकलो, महाविजय झाला. विधानसभेला आपण १४९ जागा लढलो आणि १३२ जागांवर जिंकलो, असे बावनकुळे म्हणाले.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.