
भाजपा (BJP) मुस्लीमविरोधी नाही, तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दि. २७ मार्च रोजी मांडली. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
( हेही वाचा : बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करून कारवाई करा; High Court चे निर्देश)
बावनकुळे पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नाशिक आणि परभणीच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे (Pakistan) झेंडे फडकत होते. त्याविरोधात आमची भूमिका आहे. पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. सर्वच मुस्लीम हे विरोधी नाहीतच. राज्यात हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) यांच्यामध्ये एकोप्याचे नाते आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहोत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.”
तसेच हिंदुत्व (Hindutva) आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला. आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले. आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
दरम्यान “उद्धव ठाकरे यांना पुढील भविष्य दिसत नाही, म्हणूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करतात,” असे सांगून मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रात त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करावे. लोकसभेनंतर आम्ही पक्ष वाढवण्यासाठी जनतेमध्ये जात आहोत, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या बाहेर पडत आहे. अनेक लोक सोडून गेले आहे. त्यांच्यासोबत आता जे काही कार्यकर्ते उरले आहेत, ते सांभाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत.”, असा सल्लाही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंना दिला. (BJP)
त्याचबरोबर भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही, असा शब्दात ठाकरेंचा समाचारही त्यांनी घेतला. (Chandrashekhar Bawankule)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community