“अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे ५२७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होत असून, येत्या सोमवारी (२२ जानेवारी) जगातील सर्वात मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होतील. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करावे,” असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला पुणेकरांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील ५०६ राज्यअतिथी उपस्थित राहणार ; जाणून घ्या कोण आहेत निमंत्रणाच्या यादीत)
संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर, हभप पंकज महाराज गावडे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष राजेश पांडे, हेमंत रासने, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दादा वेदक, मा. का. देशपांडे, पतित पावन संघटनेचे नितीन सोनटक्के उद्योजक रविंद्र रांजेकर, प्रसाद देशपांडे, नंदू घाटे, सारंग काळे आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या दाव्यात तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश)
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “एकविसाव्या शतकातील पिढी घडवणारा ‘अपने अपने राम’ हा कार्यक्रम आहे. वाल्मिकी रामायण अतिशय कलात्मक व काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची शैली डॉ. कुमार विश्वास यांची असून, या रामकथेतून प्रत्येकाने मूल्ये, संस्कार शिकण्याची गरज आहे. हा कार्यक्रम प्रत्येकाला जगण्याची दिशा देणारा आहे. अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या उत्सवात आपण प्रत्येकाने सहभागी व्हावे.”
(हेही वाचा – Weather Update : थंडीचा मुक्काम अजून वाढला; मुंबई पुण्यासह उत्तर प्रदेशात तापमानात घट)
२२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर –
“देशभर साजरा होणाऱ्या या उत्सवात प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुट्टी देण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारने २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या ११ दिवसांपासून अनुष्ठान केले असून, मनोभावे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत,” असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community