भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) शुक्रवार व शनिवार दि. २३ व २४ ऑगस्ट २०२४ रोजी दोन दिवस अमरावती जिल्हा (Chandrashekhar Bawankule Amravati Visit) दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहतील. (Chandrashekhar Bawankule)
(हेही वाचा – CM Majhi Ladki Bahin Yojana : मुंबईत केवळ पाऊण लाख महिलांचेच अर्ज मंजूर)
असा असेल दिनक्रम
शुक्रवार (२३ ऑगस्ट) अमरावती जिल्ह्या झाल्यानंतर शनिवार (२४ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वा. चिखलदरा येथे मेळघाट विधानसभा क्षेत्रातील (Melghat Assembly Constituency) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते दुपारी २ वा. अचलपूर येथील अंबिका लॉन, परतवाडा येथे अचलपूर-चांदूरबाजार विधानसभा (Achalpur-Chandurbazar Assembly) क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. ६ वा. दर्यापूर येथील विहान रिसॉर्ट (मंगल कार्यालय), हिंगणी रोड येथे दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यांच्या या प्रवासात जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे, अमरावती शहराध्यक्ष आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community