सूर्यास्तानंतर स्लिपमोडमध्ये गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सूर्योदय झाल्यावर ते सक्रिय होतील अशी आशा वाटत होती, पण इस्रोला (ISRO) मागील ३ दिवसांपासून अपयश येत आहे. मागील तीन दिवसांपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दिवस आहे, सूर्यप्रकाश येत आहे, त्यामुळे इस्रोकडून वारंवार विक्रम आणि प्रज्ञानला संदेश पाठवण्याचा प्रयत्न होत होता, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
याविषयी इस्रोने (ISRO) जोपर्यंत तिथे सूर्यास्त होत नाही तोवर विक्रम आणि प्रज्ञान यांना संदेश पाठवले जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रज्ञान रोव्हरने १०५ मीटर पर्यंत प्रवास केला होता. विक्रम लँडरने देखील उडी मारून दाखवली होती. पाणी, ऑक्सिजन आणि अन्य गोष्टी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असल्याचा शोध देखील लावला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एखादा देश पोहचण्याची ही पहिलीच वेळ होती. तर चंद्रावर उतरणारा भारत अमेरिका, रशिया, चीननंतरचा चौथा देश ठरला होता.
चंद्रावर सूर्यास्त झाल्यावर इस्रोने (ISRO) विक्रम आणि प्रज्ञान यांना स्लिपमोडवर पाठवले होते. त्याआधी दोघांची बॅटरी चार्ज करण्यात आली होती आणि त्याचे सोलर पॅनल्स सूर्याच्या दिशेने ठेवण्यात आले होते, जेणेकरून सूर्याची किरणे थेट त्यावर पडतील आणि ते पुन्हा अॅक्टीव्ह होतील. मात्र सूर्योदय होऊन ३ दिवस झाले तरी त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. इस्रोने (ISRO) ही मोहिम फक्त १४ दिवसांची केली होती आणि १४ दिवसात या मोहिमेची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली होती. जर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा काम करू लागले तर ते बोनस ठरले. पण आता तसे होण्याची शक्यता कमी दिसते.
(हेही वाचा Khalistani : कॅनडात खलिस्तान्यांकडून गुजराती भाषिकांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल)
Join Our WhatsApp Community