Chandrayaan – 3 चंद्रावर पोहचले, पाकिस्तानी म्हणतात आम्ही आधीच पोहोचलोय, व्हिडिओ व्हायरल

भारताचे यान चंद्रावर पोहोचल्याविषयी पाकिस्तानी यूट्यूबर सोहेब चौधरी यांनी पाकिस्तानातील लोकांशी गप्पा मारल्या.

140

भारताचे Chandrayaan – 3 बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी लँड झाले. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. संपूर्ण जगात भारताच्या Chandrayaan – 3चे LIVE प्रेक्षपण लोकांनी बघितले. अनेक देशांनी भारताचे तोंड भरून कौतुक केले. तर यावर शेजारी देश पाकिस्तानातील जनतेने Chandrayaan – 3 वर प्रतिक्रिया दिल्या. लोक स्वतः सांगत आहेत की, ते आधीच चंद्रावर राहतात. या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.

काय म्हणतात पाकिस्तानी?

खरं तर, Chandrayaan – 3 चे यशस्वी लँडिंग झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक पोस्टर्स दिसू लागल्या आहेत. दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचे लोक आधीच चंद्रावर राहत असल्याचे सांगितले जात आहे. भारताचे यान चंद्रावर पोहोचल्याविषयी पाकिस्तानी यूट्यूबर सोहेब चौधरी यांनी पाकिस्तानातील लोकांशी गप्पा मारल्या, तेव्हा एका पाकिस्तानी व्यक्तीने सांगितले की, भारत पैसे गुंतवून चंद्रावर जात आहे. आपण आधीच चंद्रावर राहत आहोत, हे तुम्हाला माहीत नाही का?

(हेही वाचा Chandrayaan – 3 : प्रज्ञान रोव्हर १४ दिवसांत काय शोधणार? जाणून घ्या…)

अशा स्थितीत आधी सर्वांनाच धक्का बसला, मग विचारले कसे, मग त्या व्यक्तीने लोकांना विचारले की, चंद्रावर पाणी आहे का? ते नाही, नाही का? ते इथेही नाही. तो पुढे म्हणाला की गॅस आहे का? नाही, नाही, इथेही नाही. त्या व्यक्तीने सांगितले की, चंद्रावर पाणी नाही, गॅस नाही आणि वीज नाही. हे सर्व इथे (पाकिस्तान) देखील नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.