देशासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या चंद्रयान-3 मोहिमेत महाराष्ट्राचंही योगदान आहे. राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदी आणि फॅब्रिक्स या दोन वस्तूंचा या मोहिमेसाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चांदीची खाण असलेल्या फक्त खामगावकरिताच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
(हेही वाचा – Konkan Railway : गणेशोत्सवासाठी कोकणातील गाडयांना अतिरिक्त कोच)
खामगाव चांदी या धातूसाठी प्रसिद्ध आहे. खामगावला रजत नगरी किंवा सिल्व्हर सिटी म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणी मिळणारी चांदी शुद्ध असल्याने तिचा चंद्रयान – 3 मोहिमेसाठी स्टर्लिंग ट्युबमध्ये ही चांदी वापरण्यात आली आहे तसेच येथील विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चंद्रयान -3 साठी लागणाऱ्या थर्मल शील्ड पुरवल्या आहेत. चंद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक खामगाव येथील भिकमची फॅब्रिक्सने तयार केला आहे.
हेही पहा –