भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेद्वारे इस्त्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर विक्रम लँडरचं लँडिंग केलं. 23 ऑगस्ट 2023 रोजी ही मोहिम यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर विक्रम लँडरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करत आहे.चंद्रावरील तापमान, येथील जमिनीत असलेल्या खनिजांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे, मात्र आता एक नवीनच माहिती उघडकीस आली आहे.
Chandrayaan-3 Mission:
In-situ Scientific ExperimentsAnother instrument onboard the Rover confirms the presence of Sulphur (S) in the region, through another technique.
The Alpha Particle X-ray Spectroscope (APXS) has detected S, as well as other minor elements.
This… pic.twitter.com/lkZtz7IVSY
— ISRO (@isro) August 31, 2023
प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर होत असलेल्या नैसर्गिक निरीक्षणांची नोंद केली आहे. लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडद्वारे ही नोंद करण्यात आली आहे.प्रज्ञान रोव्हर आणि इतर पेलोड्सनेही यासंबंधीचा डेटा पाठवला असून आता या नोंदीचे निरीक्षण केले जात आहे.त्यामुळे आता चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. या संशोधनातून क्रांतिकारी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील ही घटना खरोखरच भूकंपाची आहे की आणखी काही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
(हेही वाचा – Virat Kohli on Pakistan Clash : आशिया चषकातील भारत – पाक लढतीबद्दल विराटला काय वाटतं?)