Chandrayaan-3 : भारताची ‘चांद्रयान-३’ मोहीम; काय आहे वैशिष्ट्ये?

220

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरला सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्रावर अलगद उतरण्यात अपयश आल्यानंतर त्या मोहिमेचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी आणखी एक मोहीम आखण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) केली होती. त्याला अनुसरून सुमारे ६१५ कोटी रुपये खर्चून चार वर्षांत चांद्रयान-३ ही मोहीम सज्ज करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी, १४ जुलै रोजी चांद्रयान-३ अवकाशात झेपवणार आहे. ‘चांद्रयान-३’चे तीन प्रमुख भाग आहेत. विक्रम लँडर (चांद्र स्थानक), प्रग्यान रोव्हर (स्वयंचलित वाहन) आणि प्रोपल्जन मॉड्यूल (वाहक यंत्रणा).

चांद्रयान- ३ लाँच कसे होणार?

चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बायटर (कक्षायान) चंद्राभोवती कार्यरत असल्याने चांद्रयान-३ मोहिमेत ऑर्बायटरचा समावेश करण्यात आलेला नाही. गरज असेल तेव्हा चांद्रयान-२ ऑर्बायटर विक्रम लँडरशी संपर्क साधू शकेल. त्याचसोबत प्रोपल्जन मॉड्यूलही चंद्राभोवतीच्या १०० किलोमीटरच्या कक्षेतून संदेशांची देवाण- घेवाण करेल. ‘चांद्रयान- ३’चे प्रक्षेपण लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या साहाय्याने करण्यात येईल.

(हेही वाचा Devendra Fadanvis : फडणवीसांनी सांगितला २०१९मधील घटनाक्रम; म्हणाले उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची घेतली खोटी शपथ)

काय आहेत उद्दिष्ट्ये?

चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचं उद्दिष्ट्यं आहे. तसंच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणं आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणं ही यामागची उद्दिष्ट्यं आहेत. मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरेल. मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असून, त्याचे नेमके स्वरूप भारताच्या मोहिमेतून समजेल. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्ये उलगडण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील नोंदींचा उपयोग होईल. चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेच्या आर्टेमिस मिशनला चांद्रयान ३ कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. ती मोहीमही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.