चांदुर रेल्वे आगाराने पास तर दिला, पण बसेसच नाहीत, विद्यार्थी संतापले

एसटी बसचा पास काढला, मात्र चांदूर रेल्वे आगाराच्या बसफे-याच वडगाव, दिपोरी मार्गावर नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन आर्थिक भुर्दंड बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी चांदूर रेल्वे एसटी आगारावर धडक दिली.

चांदूर रेल्वे ते धामणगाव, दिपोरी मार्गावरील बस फे-या एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकांना आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडावी लागली. तर खासगी वाहनाने प्रवास केल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. चांदूर रेल्वे ते धामणगाव मार्गावरील वडगाव, रामगाव, दिपोरी, राजना येथील 85 विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात. सर्व विद्यार्थ्यांनी बस पास काढला, परंतु एक महिन्यापासून या मार्गावर बस धावली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांनी प्रवास केला. सर्व विद्यार्थी गरीब व शेतकरी-मजुरांची मुले असून त्यांना खासगी वाहनाने प्रवास केल्याने दुप्पट पैसे मोजावे लागले. अनेकांकडे पैसे नसल्याने शाळा बंद झाली. एसटी बस वळसा देऊन जात असल्याने बसभाडे दुप्पट झाले आहे.

( हेही वाचा: “…तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”, ‘या’ मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा )

विद्यार्थ्यांच्या समस्या आमदारांपुढे मांडल्या

या सर्व समस्या घेऊन विद्यार्थी, वडगाव सरपंच, गावकरी सर्व पालक वर्ग माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेले. वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि चांदूर रेल्वे बस आगार प्रमुख यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. आगार प्रमुख यांनी या मार्गावरील बसफे-या नियमित सुरू करू, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी परीक्षित जगताप, संदीप शेडे, निलेश सूर्यवंशी, शहजाद सौदागर, सुमेद सरदार यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here