पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यासंदर्भातील शासन निर्णयात शिक्षण विभागाने बदल केला. आता इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. याआधी इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यासंदर्भात शासन निर्णय मागील आठवड्यात जारी करण्यात आला होता. याशिवाय इयत्ता पहिलीचे पुस्तकही चार विभागात विभागले जाणार आहे. यामध्ये सुद्धा काही वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे या म्हटले आहे.
पुस्तकाच्या किंमती वाढणार
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात गुरुवारी, २ मार्च रोजी प्रसिद्ध केला होता. राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील. इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीची पाठ्यपुस्तके सुद्धा चार भागांमध्ये विभागली जाणार असून वह्यांची पाने याला जोडल्याने पुस्तकांच्या किमती वाढणार आहेत.
(हेही वाचा अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक)
Join Our WhatsApp Community