नारळी पौर्णिमेनिमित्ताने कळवा येथील खाडीजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे तिथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत ठाणे शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत कळवा पूल वाहतूकीसाठी बंद असणार आहे. येथील वाहतूक कोर्टनाका, पूर्व द्रुतगती महामार्ग, साकेत पूल मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
कळवा खाडी परिसरात नारळीपौर्णिमेनिमित्त कोळी समाजाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे मागील दोनवर्ष साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला गेला. आता कोरोनाचा प्रादु्र्भाव कमी झाल्याने, उत्सव साजरा करण्यासाठी मोठी गर्दी या भागात होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथील वाहतूक बदल करुन वाहतूक पर्यायी मार्गे वळवली आहे. गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे बदल लागू करण्यात आले आहेत.
( हेही वाचा: मुंबईत चौपाटीला भेट देण्यापूर्वी सावधानता बाळगा! )
असे असतील बदल
- कळवा पूल येथून उर्जिता उपहारागृहमार्गे कोर्टनाका आणि सिडकोच्या दिशेने वाहतूक करणा-या वाहनांना उर्जिता उपहारगृह येथे प्रवेशबंदी असणार आहे. येथील वाहने उपहारगृह येथून कारागृह वसाहत, आरटीओ कार्यालयासमोरुन जीपीओ येथून जातील
- सिडको येथूल कळवा नाक्याच्या दिशेने वाहतूक करणा-या वाहनांना दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथून अे-वन फर्निचर दुकान मार्गे जातील.
- ठाण्याहून कळवा पूल मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणा-या राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या, खासगी बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल,खोपट येथून प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पूर्व द्रुतगती महामार्गे गोल्डन डाईज नाका, पारसिक नाका मार्गे वाहतूक करतील.
- कळवा, विटावा, जकातनाका, पारसिक चौक, बाळकूम येथून साकेत आणि गोल्डन डाईज नाका मार्गे कळव्याच्या दिशेने येणा-या सर्व जड- अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.