…तर मग विदर्भातील कार्यालयीन वेळा बदला

118

गेल्या काही दिवसांत विदर्भातील लोक वाढत्या उष्माघाताने हैराण झाले असून त्यांना उष्माघातासह पोटाचे विकारही होत आहेत. शरीरातील उष्म्यामुळे तसेच रस्त्यावरील सुमार दर्जाच्या सरबताच्या सेवनामुळे विदर्भातील जनतेला जुलाबाचाही त्रास होऊ लागला आहे. यंदाची विदर्भातील उष्णतेची लाट भयावह ठरत असल्याने विदर्भातील कार्यालीन वेळा बदलण्याची गरज विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने व्यक्त केली आहे.

विदर्भातील १६० खासगी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या या खासगी संघटनेच्या कन्वेनर तसेच जनरल फिजिशियन डॉ. राजेश अटल यांनी यंदाच्या विदर्भातील उष्णतेची दाहकता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत फारच जास्त असल्याची माहिती दिली. दुपारच्या वेळेत उन्हाचा संपर्क टाळता येईल, अशा कार्यालयीन वेळा केल्यास उष्माघातापासून संरक्षण होण्यास मदत होईल, असे डॉ. अटल यांनी सूचवले आहे. एप्रिल – मे महिन्यात विदर्भातील बहुतांश भागांत कमाल तापमान जास्तच दिसून येते. यंदा पंचेचाळीस अंशापुढे नोंदवले जाणारे तापमान नोंदणीपेक्षाही दोन अंशाने जास्त असल्याचा भास सूर्याच्या संपर्कात आल्यावर होतो, असे डॉ. अटल म्हणतात.

उष्माघातावर नियंत्रण मिळण्यासाठी

उष्तेच्या लाटांची संख्याही आता विदर्भात वाढू लागली आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ दरम्यान नागपूरातील रस्त्यांवर आता कोणतीच हालचाल दिसून येत नाही आहे. उष्माघातांच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. हे रुग्ण नागपूरात नजीकच्या जिल्ह्यांतूनही उपचारांसाठी दाखल होत आहेत. सरकारी रुग्णालयांतही उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार मिळण्यासाठी विशेष कक्ष बनवला गेला आहे.

रोजच्या रुग्णांत जुलाबामुळे २० टक्के रुग्णांची नोंद होत आहे. स्थानिक विदर्भातील लोकांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे तंत्र अवगत आहे. परंतु कामगार वर्ग तसेच विदर्भात उन्हाळ्यात पर्यटनासाठी आलेल्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • डॉ अनुप मरार, प्रमुख, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.