देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्टला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईत अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने अनेक बस मार्गात बदल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ‘या’ क्रांतीकारकांचे स्मरण करण्याची ही वेळ; पंतप्रधानांनी जागवल्या स्वांतत्र्यलढ्यातील आठवणी )
बसमार्गात बदल
मंत्रालय येथे अमृतमहोत्सवानिमित्त झेंडावंदनचा कार्यक्रम असल्यामुळे वाय बी चव्हाण जंक्शन ते अहिल्याबाई होळकर जंक्शन रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे बस मार्ग क्र.सी ८६,१२१,१३७,१३८ हे एम. के .मार्गाने सकाळी ८.०० वाजल्यापासून वळविण्यात आले आहेत.
बस क्र १६७ च्या बाळासाहेब मधुकर मार्गावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाकरिता स्टेज उभारल्यामुळे बस मार्ग क्र १६७ प्रभादेवी स्टेशन वरून डावे वळण घेऊन फितवाला मार्गाने पी .के .कुरणे चौकाकडे जातील. सदर परावर्तन पहिल्या बस पासून करण्यात आले आहे.
दरम्यान बेस्ट भवन येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण महाव्यवस्थापक श्री लोकेश चंद्र यांच्या हस्ते संपन्न झाले.
Join Our WhatsApp Communityबेस्ट भवन येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण महाव्यवस्थापक श्री लोकेश चंद्र यांच्या हस्ते संपन्न झाले.#mumbai
#AmritMahotsav #अमृतमहोत्सव pic.twitter.com/EkybjD99qw— BEST Bus Transport (@myBESTBus) August 15, 2022