आदित्य ठाकरेंमुळे राज्यातील पर्यटनक्षेत्र असे बहरले!

184

आदित्य ठाकरे यांनी २०१९ पासून महाराष्ट्र पर्यटन विभागाचा पदभार स्वीकारल्यावर पर्यटन क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले. कोरोनामुळे पर्यटन विषयक व्यवसायांचे सर्वाधिक नुकसान झाले. अशा स्थितीत आदित्य ठाकरेंनी विविध संकल्पना अंमलात आणत महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी दिशा दिली. विदेश प्रवासावर मर्यादा असल्यामुळे पर्यटकांनी राज्यभरात भ्रंमती करण्यास सुरूवात केली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून नवनवीन योजना राबवण्यात आल्या. महाराष्ट्र पर्यटनाला प्रामुख्याने समाजमाध्यमांमुळे दिशा मिळाली. #MaharashtraUnlimited अशा प्रकारच्या हॅशटॅगचा वापर करत सोशल मिडियावर महाराष्ट्र पर्यटन प्रमोट करण्यात आले, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

आदित्य ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पर्यटन क्षेत्रातील प्रगती

कोरोना काळात सुरक्षेची खबरदारी घेऊन पर्यटन मंत्रालयाकडून विविध पॅकेज जारी करण्यात आले. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून आधुनिक पर्यटनाला चालना मिळाली. यामध्ये साहसी पर्यटन, कॅम्पिंग, बाइकिंग, सेल्फ-ड्राइव्ह, बीच शॅक्स, कारवान पर्यटन यांचा समावेश होतो. जूनपासून निर्बंध कमी झाल्यावर महिन्याभरात पर्यटन क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ झाली.

( हेही वाचा : कोकणचे कॅलिफोर्निया व्हाया गोवा! काय आहे हा अनोखा उपक्रम? )

कोकणचे निसर्गसौंदर्य सर्वश्रूत आहे. कोकणचे सौंदर्य अबाधित ठेवत, कोकणात बीच शॅक्स धोरण, स्कूबा डायव्हिंगसाठी आरमार बोट, साहसी पर्यटन धोरण राबवण्यात येत आहे. २०१९ पासून महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय ट्वीटरवर, इन्स्टाग्राम, फेसबुक या अॅप्सवर सक्रिय झाले आहे. विविध ट्रॅव्हल ब्लॉगर (Influencer, collaborator) यांच्या मदतीने महाराष्ट्र पर्यटन प्रमोट करण्यात येत आहे. इन्स्टाग्राम रिल्स, ट्वीटर ट्रेंड यामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यापूर्वी पर्यटन मंत्रालय समाजमाध्यमांवर एवढ्या प्रमाणात सक्रिय नव्हते, अशी माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. समाजमाध्यमांवर अलिकडे प्रामुख्याने तरुणपिढी सक्रिय असते. त्यामुळे या माध्यमांचा फायदा पर्यटनाला चालना देण्यासाठी होतो. असेही त्यांनी सांगितले.

मार्च 2019 ते 2020 आणि मार्च 2020 ते 2021 दरम्यान महाराष्ट्रातील पर्यटन

  • 2019 मध्ये महाराष्ट्रात देशांतर्गत पर्यटक भेटींची संख्या – 149.30 दशलक्ष
  • 2019 मध्ये महाराष्ट्रात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या – 5.5 दशलक्ष
  • 2020 मध्ये महाराष्ट्रात देशांतर्गत पर्यटक भेटींची संख्या – 39.23 दशलक्ष (कोरोना निर्बंध असल्यामुळे पर्यटक संख्या कमी)
  • 2020 मध्ये महाराष्ट्रात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या -1.26 दशलक्ष

2019 नंतर पर्यटनाला सुगीचे दिवस

कोरोना काळानंतर पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामुळेच इंडस्ट्रीयल पर्यटन (Industrial tourism) अंतर्गत नोंदणीकृत हॉटेल्सला सरकारमार्फत स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात आला, तसेच माहितीपर वेबिनार, कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीची माहिती देण्यासाठी समाजमाध्यमांवर #MaharashtraCuisine हा हॅशटॅग वापरला जातो. २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट भारतात आली, त्यानंतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाला, परंतु याच काळात समाजमाध्यमांवरील आभासी पर्यटनाने जनतेच्या मनात घरात केले आणि याचाच परिणाम म्हणून ‘रिव्हेंज टुरिझम’ अंतर्गत आता महाराष्ट्राच्या पर्यटनात लक्षणीय वाढ झालेली आहे.

( हेही वाचा : सिंधुदुर्गच्या जल पर्यटनात नवा अध्याय! )

आदित्य योगदान!

कोकणातील स्कूबा डायव्हिंग आरमार बोटीच्या लोकार्पणादरम्यान, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हे उद्दीष्ट असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या काळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात विविध सकारात्मक बदल होतील, असेही त्यांनी सांगितले. या नवनवीन संकल्पना, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास यामुळे येत्या काही काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याचा आशावाद पर्यटन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.