राज्यातील परीक्षांमध्ये होणारा गोंधळ आता राज्यासाठी नवा राहिलेला नाही. त्यातच परीक्षांच्या तारखा घोषित करुन त्या सतत बदलणं हेही विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडलं आहे. कारण आता नुकतचं सरकारने पुन्हा एकदा म्हाडा आणि एमपीएसचीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आता परीक्षा ऑनलाईन
म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. 7 फेब्रुवारीपासून सुरु होणा-या परीक्षा आता 31 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. 31 जानेवारी, 2, 3,7,8,9 फेब्रुवारी या सहा दिवसांत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 565 पदांसाठी होणारी ऑफलाईन परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे.
( हेही वाचा: रात्री पवई तलावात चोरी छुपे कसले बांधकाम सुरु आहे? )
परिपत्रक जारी करुन दिली माहिती
तसेच, राज्यात लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणा-या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जारी करुन ही माहिती देण्यात आली आहे. गट ‘ब’ च्या दर्जाच्या पदांसाठी मुख्य परीक्षा होणार होत्या. मात्र या मुख्य परीक्षेआधी झालेल्या पूर्व परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उत्तर पत्रिका तपासताना, चूक झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.