पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ३० जून ते १३ जुलै दरम्यान वाहतूक मार्गात बदल

70

पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ३० जून ते १३ जुलै या दरम्यान पंढरपूर शहर व परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)

वाहतूक मार्गात

१) पंढरपूरकडून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग – वाखरी, साळमुख चौक, पिलीव, म्हसवड, फलटण, पंढरपूर, टेंभुर्णी.

२) पुणे – फलटण पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांसाठी – फलटण चौक, म्हसवड, पिलीव, साळमुख चौक.

३) अकलूज येथून पंढरपूरमार्गे सोलापूरला जाणारी वाहतूक – अकलूज टेंभुर्णी सोलापूर मार्ग.

४) सोलापूर येथून पंढरपूरमार्गे अकलूजकडे जाण्यासाठी – सोलापूर, टेंभुर्णी, अकलूज मार्गे.

५) वेळापूर ते पंढरपूर वाहनांसाठी – साळमुख चौक, सातारा रोड, पंढरपूर या मार्गाचा अवलंब करावा.

६) सांगोला येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – साळमुख चौक, वेळापूर, अकलूज इंदापूर.

७) पुणे – इंदापूर- पंढरपूर येथे येण्यासाठी – पुणे, टेंभुर्णी पंढरपूर या मार्गाचा अवलंब करावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.