जी -20 परिषद, मुंबईत वाहतूक मार्गांत बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

152

मुंबईमध्ये आयोजित जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 16 डिसेंबरपर्यंत वाहतूक रहदारी सुरळीत राहण्यासाठी आणि वाहन चालकाची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे दिली आहे.

बंद मार्ग

  • नेहरु रोडकडून हाॅटेल ग्रॅंण्ड हयातकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांकरता बंद ( आतत्कालीन सेवा वाहने वगळून)
  • हाॅटेल ग्रॅंण्ड हयातकडून जुना सीएसएमटीकडे जाणार रस्ता सर्व वाहनांकरता बंद
  • पटुक महाविद्यालय जंक्शनकडून हाॅटेल ग्रॅंण्ड हयातकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांकरता बंद

( हेही वाचा: ‘CNG’ वरील गाड्या खरेदीचा निर्णय ‘MSRTC’ कडून रद्द; डिझेल गाड्याच घेणार! )

‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

  • नेहरु रोडवरुन हनुमान मंदिरापासून उजवीकडे वळण न घेता सरळ मिलिट्री कॅम्प जंक्शनवरुन उजवे वळण घेऊन कलिना जंक्शनमार्गे आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा रोडवर मार्गस्थ होतील.
  • जुन्या सीएसएमटी रोडवरुन हाॅटेल ग्रॅंड हयातकडे येणा-या वाहनांनी उजवे वळण न घेता सरळ हंस भुग्रा जंक्शनमार्गे नेहरु रोड, सांताक्रुझ स्टेशन किंवा पश्चिम द्रुतगती महामार्गाने पुढे मार्गस्थ होतील.
  • नेहरु रोडवरुन पटुक जंक्शनवरुन उजवीकडे जाणारी वाहने उजवे वळण न घेता सरळ मिलिट्री कॅम्प जंक्शनवरुन उजवे वळण घेऊन कलिना जंक्शनमार्गे आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा रोडवर मार्गस्थ होतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.