मुंबईमध्ये आयोजित जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 16 डिसेंबरपर्यंत वाहतूक रहदारी सुरळीत राहण्यासाठी आणि वाहन चालकाची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे दिली आहे.
बंद मार्ग
- नेहरु रोडकडून हाॅटेल ग्रॅंण्ड हयातकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांकरता बंद ( आतत्कालीन सेवा वाहने वगळून)
- हाॅटेल ग्रॅंण्ड हयातकडून जुना सीएसएमटीकडे जाणार रस्ता सर्व वाहनांकरता बंद
- पटुक महाविद्यालय जंक्शनकडून हाॅटेल ग्रॅंण्ड हयातकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांकरता बंद
( हेही वाचा: ‘CNG’ वरील गाड्या खरेदीचा निर्णय ‘MSRTC’ कडून रद्द; डिझेल गाड्याच घेणार! )
‘हे’ आहेत पर्यायी मार्ग
- नेहरु रोडवरुन हनुमान मंदिरापासून उजवीकडे वळण न घेता सरळ मिलिट्री कॅम्प जंक्शनवरुन उजवे वळण घेऊन कलिना जंक्शनमार्गे आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा रोडवर मार्गस्थ होतील.
- जुन्या सीएसएमटी रोडवरुन हाॅटेल ग्रॅंड हयातकडे येणा-या वाहनांनी उजवे वळण न घेता सरळ हंस भुग्रा जंक्शनमार्गे नेहरु रोड, सांताक्रुझ स्टेशन किंवा पश्चिम द्रुतगती महामार्गाने पुढे मार्गस्थ होतील.
- नेहरु रोडवरुन पटुक जंक्शनवरुन उजवीकडे जाणारी वाहने उजवे वळण न घेता सरळ मिलिट्री कॅम्प जंक्शनवरुन उजवे वळण घेऊन कलिना जंक्शनमार्गे आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा रोडवर मार्गस्थ होतील.