MPSC कडून टायपिंग स्किल टेस्टमध्ये बदल! विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन

99

लिपिक टंकलेखक आणि कर सहायक परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये MPSC ने बदल केल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी पुण्यात पुन्हा एकदा आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

( हेही वाचा : लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील; संजय शिरसाटांचा मोठा दावा)

विद्यार्थ्यांकडून पुन्हा आंदोलन 

लिपिक टंकलेखक आणि कर सहायक परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टबाबत एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या नियमांनुसार न घेता त्यात अचानक बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषदेच्या नियमांनुसार घेतली पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार अशी भूमिका MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या परीक्षेसाठी आयोग जी चाचणी घेणार आहे त्याची शब्द मर्यादा जास्त आहे, आमची आयोगाला विनंती आहे की, मराठी ३० साठी शब्दमर्यादा १२० ते १३० शब्द आहेत आणि इंग्रजीसाठी २१० ते २३० शब्द आहेत. याप्रमाणे चाचणी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी आयोगाकडे केली आहे. आमच्याकडे जे जीसीसी प्रमाणपत्र आहे, त्यानुसार १२० ते १३० शब्दांचा पॅसेज असतो तो आम्हाला १० मिनिटामध्ये पूर्ण करावा लागतो. परंतु आता आयोगाने मराठीसाठी ३०० शब्द आणि इंग्रजीसाठी ४०० शब्द दिले आहेत. ही शब्दमर्यादा दुपटीपेक्षा जास्त आहे असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.