ठाणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल! ‘या’ मार्गांवर महिनाभर प्रवेश बंदी

173

ठाणे शहरातील वागळे इस्टेट वाहतूक उपविभागाचे कार्यक्षेत्रातील शास्त्रीनगर नाका ते देवदयानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मंत्रांजली बंगला येथील मार्गावर कल्व्हर्टच्या (रस्त्याखालील पाण्याचा पाट culvert) पुनर्बांधणीचे काम ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील एक महिन्यासाठी या भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.

( हेही वाचा : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद )

या भागातील वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद :- शास्त्रीनगर चौक कडून देवदयानगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना देवदयानगर नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग :- ही वाहने शास्त्रीनगर चौक – येऊर मेन गेट समोरून उपवन तलाव – राघोजी भांगरे चौक -बिरसा मुंडा चौक- देवयानगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- निळकठ सोसायटी, बेथनी हॉस्पीटल येथून शास्त्रीनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बिरसा मुंडा चौक येथे “प्रवेश बंद” करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग :- ही वाहने बिरसा मुंडा चौक येथून उपवन कडून राघोजी भांगरे चौक – उपवन तलाव – शास्त्रीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील. सदरची वाहने बिरसा मुंडा चौक येथून बेथनी हॉस्पिटल मार्गे गांधीनगर चौक – रवि स्टील का मार्गे इच्छित स्थळी जातील.

( हेही वाचा : मिठीच्या किनाऱ्यावर बनवणार आता कृत्रिम तलाव आणि जंगलही )

हा बदल ही 15 फेब्रुवारी 2022 पासून कल्व्हर्ट पुर्नबांधणीचे काम पूर्ण होईपर्यंत 1 महिन्याकरीता अमलात राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.