7 वर्षांनंतर केंद्र सरकारच्या दोन विमा योजनांच्या प्रीमियम दरांमध्ये 1 जूनपासून बदल

132

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजनांचा दीर्घकाळापासूनचा प्रतिकूल दाव्यांचा अनुभव लक्षात घेऊन आणि त्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी, योजनांचे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले आहेत. दोन्ही योजनांसाठी 1.25 रुपये प्रतिदिन प्रीमियम निश्चित करून योजनांचे प्रीमियम दर बदलले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेची प्रीमियम रक्कम 330 रुपये वरून 436 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेची रक्कम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आली.

( हेही वाचा :BJP नेते मोहित कंबोज यांच्यावर कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल )

लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा

31.3.2022 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या सक्रिय सदस्यांची संख्या अनुक्रमे 6.4 कोटी आणि 22 कोटी आहे. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सुरु झाल्यापासून, 31.3.2022 पर्यंत अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांकडून प्रीमियम म्हणून 1 हजार 134 कोटी रुपये जमा झाले तर दाव्यांपोटी 1 हजार 134 कोटी रुपये देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत 31.3.2022 पर्यंत अंमलबजावणी करणा-या विमा कंपन्यांनी 9 हजार 737 कोटी रुपये प्रीमियम गोळा केला आहे आणि दाव्यांचे 14, हजार 144 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. दोन्ही योजनांअंतर्गत दावे थेट लाभ हस्तांतरण मार्गाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.