भिवंडी शहरात 5 ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी मूर्तीचे विसर्जन तसेच शासकीय कार्यक्रमामुळे शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हे बदल सकाळी 6 वाजल्यापासून ते दुर्गादेवी मूर्तीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत असतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली आहे.
वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे
- प्रवेश बंद – कारीवली, हनुमान मंदिर जवळ विटभट्टी, सुतारआळी नाका या भागातून मंडई कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सुतारआळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने सुतारआळी, इदगाहरोड अथवा दर्गाहरोड मार्गाने इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – कॉटरगेट जकात नाका येथुन मंडई, बाजारपेठ व तिनबत्ती कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना हनुमानबावडी मिरॅकल मॉल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने कॉटरगेट मस्जिद येथुन जैतुनपुरा भिवंडी शहर पो. स्टे. कडून इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – धामणकर नाक्याकडून जुना ठाणा रोडने मंडईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना केशरबाग नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने केशरबाग नाका येथून उजवीकडे वळून कुंभारआळी मार्गे इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – मुंबई ठाणे बाजुकडुन जुना ठाणे आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड मध्यम वाहनांना अंजुरफाटा येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची जड वाहने वसई रोड मार्गाने कारवली जकातनाका व विटभट्टीमार्गे इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – टी.एम. टी. / एस. टी. बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पोस्टे येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – टी.एम.टी./एस.टी.चे प्रवाशी नारपोली पो.स्टे. या ठिकाणी उतरतील व तेथुनच प्रवाशी घेवुन परत जातील. आणि हलकी वाहने ही देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – राजनोली नाका बाजुकडुन भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड. अवजड मध्यम व हलकी वाहने (त्यात कार, रिक्षा, दुचाकी वाहने) यांना रांजणोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची जड, मध्यम व हलकी वाहने ही रांजणोली नाका येथून वळसा घेवून मुंबई- नाशिक बायपास हायवे वरून माणकोली नाका येथून अंजूरफाटा किंवा वसई रोडने किंवा ओवळी खिंड येथुन ओवळी गांव, ताडाळी जकातनाका किंवा पाईपलाईन रोडने इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – एस.टी./ के.डी.एम.टी बसेस यांना रांजणोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – एस. टी. के. डी.एम.टी बसेस रांजणोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथुनच प्रवाशी भरून इच्छित स्थळी जातील व इतर वाहने ही राजणोली नाका येथुनच वळसा घेवून परत जातील. - प्रवेश बंद – वाडा रोडमार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अंबाडीनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची जड अवजड वाहने अंबाडीनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईन मार्गे इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळफाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवीकडे वळून खोणी गाव, तळवली फाटा, कांबारोड या पर्यायी मार्गाने वसईरोड येथून डावीकडे वळण घेवून कारिवली मार्गे इच्छित स्थळी जातील अथवा विश्वभारती फाटा येथून डावीकडे वळून गोरसई गावमार्गे इच्छित स्थळी जातील. - प्रवेश बंद – मुंबई ठाणे बाजुकडुन जुना आग्रारोडने गोल्डनडाईज येथून कशेळी मार्गे नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गोल्डनडाईज नाका, ठाणे (पुणा क्रॉस) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहतूक ही जुना आग्रारोडने न जाता त्यांनी माणकोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 हायवे बायपास मार्गाचा वापर करून नाशिककडे जातील. - प्रवेश बंद – वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एस.टी. बसेससह धामणगांव जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची सर्व प्रकारची वाहने धामणगांव पाईपलाईन येथे उजवीकडे वळण घेवून पाईपलाईन मार्गे वाड्याकडे व पुढे इच्छित स्थळी जातील. तसेच एस. टी. बसेस या आपले प्रवाशी चाविंद्रा जकातनाका या ठिकाणी उतरवतील व तेथुनच प्रवाशी घेवून बस चळवून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद व नो पार्किंग – 5 ऑक्टोबर 2022 रोजी राजनोली नाका ते कल्याण नाका, अंजुरफाटा ते धामणकरनाका, वंजारपट्टीनाका ते नदीनाका, टावरे कम्पाऊंड, दुधबावडी नाका, दर्गारोड, केशरबाग नाका, मंडई, तिनबत्ती, बाजारपेठ, झेंडानाका, टिळकचौक, शिवाजी पथ, हाफीजीबाबा दर्गा, धामणकर नाका ते वऱ्हाळदेवी तलाव, या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुस कोणतेही वाहन उभे करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तसेच सर्व प्रकारची वाहने (दुर्गादेवी मुर्ती घेवून जाणारे वाहना खेरीज करुन) टांगे, हातगाड्या यांना सुध्दा सदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
कळवा भागातील वाहतुकीत बदल
प्रवेश बंद – नवी मुंबई बेलापूर रोडने तसेच ऐरोली- पटणी मार्गे विटावा जकात नाका कळवा शिवाजी चौकातून ठाण्याचे दिशेने येणाऱ्या जड अवजड वाहनांना व टी.एम.टी./एन.एन.एम.टी./एस.टी. व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – अ) सदरची जड अवजड वाहने ही ऐरोली-मुलुंड- आनंदनगर जकात नाका पूर्व द्रुतगती महामार्गावरून इच्छित स्थळी जातील. ब) टी.एम.टी./एन.एन.एम.टी./एस.टी व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस ह्या विटावा जकात नाका येथे प्रवासी उतरवून तेथूनच प्रवासी भरून परत नवी मुंबई कडे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – पूर्व द्रुतगती महामार्ग (रा.म.क्र.3) वरील गोल्डन डाईज नाका येथून ठाणे शहरातून मिनाताई ठाकरे चौक- जी.पी.ओ. नाका किक नाका – कळवा मार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड – अवजड वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही गोल्डन डाईज नाका येथूनच पूर्व द्रुतगती महामार्गवरून कॅडबरी जंक्शन- नितीन जंक्शन -तीन हात नाका – कोपरी ब्रिज वरून आनंदनगर नाका- मुलूंड मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – रा.म.क्र.3 खारेगाव टोल नाका येथून मुंब्रा बायपास मार्गे नवी मुंबई च्या दिशेने गॅमन नाका (गणेश विसर्जन घाट) रेतिबंदर पारसिक सर्कल मुंब्रा बायपास मार्गे जाणाच्या जड अवजड वाहनांना खारेगांव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही रा.म.क्र.3 खारेगाव टोल नाका येथून सरळ-गोल्डन डाईज नाका कॅडबरी नाका- नितीन कंपनी नाका तीन हात नाका कोपरी ब्रिज वरून आनंदनगर जकात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – बाळकुम नाका -साकेत –किक नाका येथून शिवाजी चौक कळवा च्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड वाहनाना बाळकुम नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही बाळकुम कापूरबावडी नाका – गोल्डन डाईज नाका कॅडबरी नाका- नितीन कंपनी
नाका तीन हात नाका कोपरी ब्रिज वरून आनंदनगर जकात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – नवी मुंबई पनवेल बाजूकडून तसेच कल्याण मानपाडा – बदलापूर अंबरनाथ कडून मुंब्रा – ठाणेच्या दिशेने येणाऱ्या जड-अवजड वाहनांना शिळ फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने शिळ फाटा येथून महापे रोडने रबाले ऐरोली ब्रिज-मुलुंड-आनंदनगर चेकनाका पूर्व द्रुतगती महामार्गावरून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – शिळफाटा येथून मुंब्रा बायपास मार्गे घोडबंदर रोड – नाशिक बाजूच्या दिशेने येणाच्या जड़ -अवजड वाहनांना शिळ फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने शिळ फाटा येथेच यु टर्न घेवून परत महापे रोडने रबाले-ऐरोली ब्रिज आनंदनगर चेक नाका पूर्व द्रुतगती महामार्गवरून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – मुंब्रा बाजूकडून पारसिक नाका मार्गे खारेगाव टोल नाका व ठाण्याचे दिशेने येणाऱ्या टी.एम.टी. व खाजगी बसेसना पारसिक सर्कल येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरच्या बसेस या पारसिक सर्कल येथे प्रवासी उतरवून तेथूनच प्रवासी घेवून परत मुंब्रा बाजूकडे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – घोडबंदर रोड-गोल्डन डाईज नाका – गोल्डन डाईज नाका ओव्हरब्रिज-साकेत ब्रिज-खारेगाव टोलनाका गॅमन चौक- पारसिक सर्कल पुढे मुंब्रा व नवी मुंबई करीता कळवा च्या दिशेने जाणाच्या जड अवजड वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही घोडबंदर रोड-गोल्डन डाईज नाका येथूनच (ओव्हरब्रिज यु टर्न) कॅडबरी नाका- नितीन कंपनी-तीन हात नाका- कोपरी ब्रिज वरून आनंदनगर जकात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
सदरची वाहतूक अधिसूचना ही दुर्गादेवी मुर्ती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 05 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी २ वाजेपासून ते सार्वजनिक तसेच खाजगी नवरात्र देवी मूर्ती, घट आणि फोटो / प्रतिमा यांचे विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत असतील. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.