हिंदू धर्मात चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा सुरू होऊन केवळ पाच दिवस झाले आहेत. भक्ती आणि उत्साहाने विक्रमी संख्येने भाविकांनी १० मे पासून चार धाम यात्रेला सुरुवात केली. परंतु, या वर्षाच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवसांत ११ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. (Char Dham Yatra)
(हेही वाचा –सर्वोच्च न्यायालयाचा Manipur UPSC परीक्षार्थींना मोठा दिलासा!)
आरोग्य विभागातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, श्वासोच्छवासाच्या किंवा इतर वैद्यकीय समस्यांमुळे या नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांचे वय ५० वर्षांहून अधिक आहे. “भाविकांनी त्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती दिली पाहिजे कारण ही सर्व देवस्थानं उंचावर आहेत. उच्च तापमान असलेल्या ठिकाणाहून प्रवास करताना तापमानाचा पारा खाली घसरत जातो. त्यामुळे डोंगरावरील हवामानाशी जुळवून घेणे कठीण जाते.” असे गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले. (Char Dham Yatra)
(हेही वाचा –IPL 2024, RCB vs CSK: बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट! ऋतुराजने सांगितलं पराभवाचं नेमकं काय कारण ?)
उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी सांगितले की, या वर्षी यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ धामची पवित्र यात्रा सुरू झाल्यापासून, मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट यात्रेकरूंनी यात्रेला (Char Dham Yatra) सुरुवात केली आहे. राज्य सरकारने सांगितले की, १४ मे पर्यंत २६ लाख ७३ हजार भाविकांनी पोर्टलवर नोंदणी केली असून १ लाख २४ हजारांहून भाविकांनी ऑफलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत, १ लाख ५५ हजार लाखांहून अधिक यात्रेकरूंनी केदारनाथला, ७० हजारांहून अधिक यात्रेकरूंनी यमुनोत्री आणि ६० हजारहून अधिक यात्रेकरूंनी गंगोत्रीला भेट दिली आहे. बद्रीनाथ धाम १२ मे रोजी उडघडण्यात आले, जिथे ४५ हजार यात्रेकरूंनी भेट दिली. (Char Dham Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community