चार धामचे (Chardham Yatra) दरवाजे यावर्षी आजपासून अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 10 मे रोजी उघडतील. या दिवशी यमुनोत्री (Yamunotri), केदारनाथ (Kedarnath) धाम आणि गंगोत्रीचे (Gangotri) दरवाजे उघडतील. 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे 2 दिवसांनी उघडले जातील. 15 एप्रिलपासून यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. अहवालानुसार, आतापर्यंत एकूण 21.58 लाख भाविकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. (Chardham Yatra)
(हेही वाचा –Akshaya Tritiya : साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त अक्षय्य तृतीयाचे महत्त्व)
हिंदू धर्मात चारधाम यात्रेला (Chardham Yatra) मोठे धार्मिक महत्त्व दिले जाते. शास्त्रानुसार चारधामच्या दर्शनाने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. अशा माणसाला नश्वर जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो. शिवपुराणानुसार जो कोणी केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि पूजा केल्यानंतर जल सेवन करतो तो पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत नाही. (Chardham Yatra)
चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात; 21 लाखांहून अधिक भाविकांनी केली ऑनलाइन नोंदणी.
.
.
.#Chardham #Kedarnath #Yamunotri #Gangotri #Badrinath #PBKSvsRCB #MaharanaPratapJayanti #crypto #PBKSvRCB #ParisTSTheErasTour #Comebacktome #Hindusthanpost #MarathiNews pic.twitter.com/Nkx2Hckw8W— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 10, 2024
मंदिराच्या सजावटीसाठी 20 क्विंटलपेक्षा जास्त फुल
केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम फुलांनी सजवले गेले आहेत. मंदिराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. केदारनाथ मंदिर 20 क्विंटलपेक्षा जास्त फुलांनी सजवण्यात आले आहे. यावेळी भाविक आस्थापथातून धाममध्ये दर्शनासाठी जातील. आस्थापथावर बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पाऊस आणि बर्फवृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी रेन शेल्टर बांधण्यात आले आहे. (Chardham Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community