30 एप्रिलपासून Chardham Yatra सुरू ; ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

30 एप्रिलपासून Chardham Yatra सुरू ; 'या' महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

74
30 एप्रिलपासून Chardham Yatra सुरू ; 'या' महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
30 एप्रिलपासून Chardham Yatra सुरू ; 'या' महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

हिंदू धर्मात चार धाम यात्रेला (Chardham Yatra) मोठं महत्त्व आहे. या यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. शिवभक्तांसाठी चार धाम यात्रा करण्याची इच्छा असते. येत्या काही महिन्यांतच आता चार धाम यात्रा सुरु होणार आहे, याबाबत आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. (Chardham Yatra)

हेही वाचा-फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र तरतूद; DCM Eknath Shinde यांची विधानपरिषदेत घोषणा

या यात्रेअंतर्गत भाविक बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतात. या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दरवाजे कधी उघडतील याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होऊन या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ घेतात. ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी जारी केल्या आहेत. दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असते. म्हणूनच यावेळी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. (Chardham Yatra)

हेही वाचा- ST Buses टप्प्याटप्प्याने अपारंपरिक इंधनावर; इलेक्ट्रिक आणि एलएनजी बसेसची योजना

चार धाम यात्रेची सुरुवात 30 एप्रिलला होणार असल्याचं सांगितलं आहे. या दिवशी सर्व प्रथम गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील यानंतर 4 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील. अशी माहिती समोर आली आहे. या शिवाय भोलेनाथच्या भक्तांसाठी खास महाशिवरात्रीच्या निमित्ताने केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत केदारनाथला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. चार धाम यात्रेची सुरुवात होण्यापूर्वी 15 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी सोयी सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. या बाबत झालेल्या बैठकीत भाविकांसाठी मुलभूत सोयीसुविधांसाठी प्रशासन 15 एप्रिलपर्यंत सज्ज होणार आहे. याच पार्श्वभूमीवर चार धाम यात्रेची नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. (Chardham Yatra)

हेही वाचा- राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढणार; Adv. Ashish Shelar यांची मोठी घोषणा

ऑनलाइन नोंदणीसाठी उत्तराखंड सरकारची वेबसाइट आहे . registrationandtouristcare.uk.gov.in या संकेत स्थळावर याबाबत माहिती मिळणार आहे.या वर्षी चारधाम यात्रेत 60% नोंदणी ऑनलाइन आणि 40% ऑफलाइन असेल असंही सांगितलं आहे. (Chardham Yatra)

हेही वाचा- Jafar Irani : कुख्यात लुटारू जाफर इराणी पोलिस चकमकीत ठार !

ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पहिले15 दिवस नोंदणीची सुविधा 24 तास उपलब्ध असेल. यानंतर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन वेळेत बदल केला जाणार आहे. नोंदणीसाठी, हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये 20-20 नोंदणी काउंटर तयार केले जातील. विकास नगरमध्ये 15 काउंटर उभारण्यात येणार आहेत. या यात्रेतील महत्त्वाची बाब म्हणजे या यात्रा सुरू होण्याच्या एक महिना आधी कोणत्याही प्रकारच्या VIP दर्शनाला परवानगी दिली जाणार नाही.व्हीआयपी भाविकांनाही सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे दर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात येणार आहे. (Chardham Yatra)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.