पर्यावरण संवर्धन तसेच पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता अनेक लोक ई-वाहनांची निवड करत आहेत. येत्या वर्षात रेल्वे स्थानकावर ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ई-वाहनांची निवड करणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विद्युत चार्जिंग यंत्रणा रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाली असून, यात केवळ उच्च क्षमतेची विद्युत जोडणी बाकी आहे.
विद्युत वाहन धोरण
केंद्र सरकारकडून विद्युत वाहन धोरण राबवले जात असून याअंतर्गत रेल्वे स्थानक, बस आगार याठिकाणी चार्जिंगची सुविधा उभारण्याचे नियोजन केले जात आहे. उच्च विद्युत जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर हे चार्जिंग स्टेशन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( हेही वाचा : आता म्हाडाची परीक्षा ‘या’ खासगी कंपनीमार्फत घेतली जाणार )
या स्थानकांवर चार्जिंग सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, परळ, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण, पनवेल या नऊ स्थानकांवर चार्जिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यापैकी पनवेल वगळता इतर सर्व स्थानकांवर आवश्यक सामग्री, यंत्र उपलब्ध झाले आहे. सद्यस्थितीत फलाट क्रमांक १८ वर चार्जिंग सुविधा सुरू आहे. येत्या वर्षात नमूद केलेल्या स्थानकांवर चार्जिंग स्टेशन सुरू होतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community