- ऋजुता लुकतुके
ओपन एआयच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटजीपीटी प्रणाली आता जगभरात चांगली रुळली आहे. त्याचवेळी कंपनीने आपला विस्तारही सुरू केला आहे. अलीकडेच त्यांनी चॅटजीपीटी सर्च हे सर्च इंजिन सुरू केलं आणि आता इतर वेब ब्राऊजर्सच्या बरोबरीने चॅटजीपीटी व्हॉट्सॲपवर वापरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सगळ्यात आधी पदार्पण केल्याचा फायदा ओपन एआय कंपनीला मिळत असला तरी या क्षेत्रातही आता स्पर्धा वाढत आहे. आणि चॅटजीपीटीची स्पर्धा अगदी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांशीही आहे. त्यामुळेच कंपनीने हे पाऊल उचललं हे उघड आहे. (ChatGPT on WhatsApp)
(हेही वाचा – खुल्या मनाने जनादेश स्वीकारा; अधिवेशनात CM Devendra Fadanvis यांची विरोधकांना टोलेबाजी)
व्हॉट्सॲपमध्ये चॅटजीपीटी उपलब्ध करून दिल्यामुळे ही प्रणाली अनेकांपर्यंत सहज पोहोचणार आहे. सेवेचा विस्तार ही रणनीती यामागे दिसत आहे. अमेरिका आणि कॅनडातील लोकांनी १-८००-chatgpt (१-८००-२४२-८४७८) या क्रमांकावर फोन केला की, चॅटजीपीटीचा चॅटबॉट व्हॉट्सॲप स्क्रीनवर अवतरेल आणि पुढे तुम्ही त्याच्याशी लेखी किंवा आवाज रेकॉर्ड करून बोलू शकता. अमेरिका आणि कॅनडा व्यतिरिक्त इतर देशांमध्ये वरील क्रमांकावर फोन करून तुम्ही चॅटबॉटला बोलावू शकता. याशिवाय क्युआर कोड स्कॅन करण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहे. (ChatGPT on WhatsApp)
(हेही वाचा – Parliament Winter Session : संसदेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित; राहुल गांधींच्या गुंडगिरीमुळे भाजपा खासदार रुग्णालयात दाखल)
सुरुवातीला ओपनएआय कंपनीने चॅटबॉटशी दर महिन्याला १५ मिनिटं मोफत संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर तुम्हाला या कॉलसाठी पैसे मोजावे लागतील. सध्या चॅटजीपीटीवर फक्त लेखी देवाणघेवाण होऊ शकते. आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही चॅटबॉट वापरू शकत नाही. सध्या फक्त एकाच क्रमांकाशी तुम्हाला हा चॅटबॉट वापरून संदेशाची देवाण घेवाण करता येईल. सध्या चॅटजीपीटी अपडेटही होणार नाही. त्यामुळे त्यात एकदाच भरलेली ऑक्टोबर २०२३ पर्यंतची माहिती तुम्ही वापरू शकाल. पण, चॅटजीपीटीवर करता येणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही करू शकता. आणि या तंत्रज्ञानाचा विकास करत राहण्याचा कंपनीचा मानस आहे. (ChatGPT on WhatsApp)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community