ChatGpt : नोकरी हवी? चॅटजीपीटीचा कसा कराल वापर?

नोकरीच्या शोधात पूर्वी भर उन्हात वणवण करावी लागे. आता ते चित्र बदलले आहे. तरीही नोकरी मिळणे सोपे झालेले नाही.

169
ChatGpt : नोकरी हवी? चॅटजीपीटीचा कसा कराल वापर?

कोणत्याही प्रश्नाचे सविस्तर आणि नेमके उत्तर देणारे ChatGpt हे ओपनएआय कंपनीचे निःशुल्क AI ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाले. अगदी थोड्याच कालावधीत या ChatGptने प्रसिद्धी मिळवली. पाच दिवसांच्या आत जगभरातील ५ दशलक्ष लोकांनी ChatGptचा वापर करून पाहिला. असं असलं तरी देखील अजूनही बऱ्याच नागरिकांना ChatGptचा वापर करतांना नेमके कोणते आणि कसे प्रश्न विचारायचे हे समजत नाही. अशातच योग्य प्रश्नाच्या मदतीने आपण नोकरी मिळवू शकतो, आपला बायोडेटा कसा योग्य पद्धतीने लिहायचा हे समजू शकते.

(हेही वाचा – मोबाईल चोरणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक; चार महागडे मोबाईल फोन जप्त)

नोकरीच्या शोधात पूर्वी भर उन्हात वणवण करावी लागे. आता ते चित्र बदलले आहे. तरीही नोकरी मिळणे सोपे झालेले नाही. जर नोकरीच्या मागणीचा ई – मेल योग्य प्रकारे लिहिता आला नाही, तर कधीही इच्छित नोकरी प्राप्त करता येणार नाही. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ई – मेल लिहिण्याचे काम चॅटजीपीटी करू शकते.

त्यासाठी ChatGptला पुढील प्रश्न विचारा –

Write an email to the (company name) for seeking (this postion) in the company. Cover these points –

Job role  – give bullet points

skills – give bullet points

experience – number of years and add general points about what one learns in those years in this (industry)

सध्या कंटेन्ट रायटिंग या क्षेत्राची मागणी अधिक आहे. अशातच आपल्या लिखाणाचे आणि चूक सुधारण्याचे काम ChatGpt करू शकतो. योग्य प्रश्न विचारून आपण ती चूक सुधारू शकतो. त्यासाठी

This is my draft for research paper – (ADD DRAFT) I want you to act as a proof-reader. You can rephrase my sentences wherever necessary. Share the list of improvements you made. The tone of draft should be (give specific tone)

आपल्या सगळ्यांनाच फिरायला जायला आवडत. पण अनेकदा टूर प्लॅनर्सकडून टूर आखून घेण्याचा खर्च अवाक्याबाहेर जातो. त्यामुळे आपण आपलीच टूर प्लॅन करण्याचा विचार करतो. इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असली तरी ती शोधणे एक दिव्यच असते. त्यावेळी ChatGptला पुढील प्रश्न विचारा –

Give me an itinerary for a two-day trip to (city) in this (month): which places to visit and foods to try from morning to night, and give me the total budget. Number of people going for this trip.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.