टोल नाक्यांवर (Toll Plazas) फास्टॅग (FASTag) वापरण्याचे नवीन नियम सोमवार, १७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. टोल भरतांना फास्टॅगमध्ये कमी पैसे शिल्लक असल्यास किंवा टोलवर येण्याच्या ६० मिनिटे आधीपर्यंत आणि पोहोचल्याच्या १० मिनिटांनंतर हॉटलिस्टमध्ये असल्यास पेमेंट नाकारले जाईल. फास्टॅगमध्ये कमी शिल्लक उशिराने पेमेंट किंवा फास्टॅग ब्लॅकलिस्ट (FASTAG Blacklist) झाल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागू शकतो.
(हेही वाचा – BMC : महापालिका कर्मचाऱ्यांना साडेदहा लाखांमध्ये मालकी हक्काचे घर… तेही मुंबईत!)
टोलवर येण्याच्या ६० मिनिटे आधी किंवा पोहोचल्याच्या १० मिनिटांची समस्या दूर केल्यास सामान्य टोल लागेल. फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असल्यास, शेवटच्या क्षणी रिचार्ज केल्यास फायदा होणार नाही. व्यवहार होणार नाही. सध्या लोक टोल बूथवर पोहोचून फास्टॅग रिचार्ज करून जाऊ शकत होते.
१५ दिवसांच्या कूलिंग पीरियडनंतरच बँका ब्लॅकलिस्टेड किंवा कमी शिल्लक असलेल्या फास्टॅगसंबंधी चुकीच्या कपातीचे पैसे परत करू शकतील. त्यानंतर फास्टॅग पूर्ववत होईल. त्यामुळे प्रवासाला निघण्यासाठी फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेशी शिल्लक ठेवा. प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅग स्टेटस (Fastag Status) तपासा. ते सक्रिय आहे का, ते पाहावे.
प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅगनंतर (FASTag) पुरेशी शिल्लक नसते, केवायसी डॉक्युमेंट अपडेट नसेल, वाहनासंबंधी कायदेशीर अडचण दूर केलेली नसल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्टेड किंवा हॉटलिस्ट होतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community