गणपतीला कोकणात जाण्यासाठी आरक्षण करताय? सर्व विशेष गाड्यांची यादी वाचा एका क्लिकवर!

174

गणेशोत्सवाला कोकणात विशेष महत्त्व असल्यामुळे मुंबई, पुण्यातून चाकरमानीवर्ग मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी गावची वाट धरतात. गणपतीला गावी जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ४ महिने आधीच फुल्ल होत असल्यामुळे दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांचे आयोजन केले जाते. यंदाही चाकरमान्यांसाठी जवळपास २०६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तुम्हाला कोकणात जायचे असल्यास तुम्हाला या गाड्यांचे आरक्षण www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह करता येईल तसेच गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देवून माहिती जाणून घेता येवू शकते.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ने जारी केली गहाळ झालेल्या स्मार्टफोनची यादी)

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची यादी खालीलप्रमाणे…

मुंबई – सावंतवाडी दैनिक विशेष (४४ सेवा)

  • 01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २१.ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01138 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २१.ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
  • गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

train

नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)

  • 01139 विशेष नागपूर येथून २४ऑगस्ट २०२२ ते १०सप्टेंबर२०२२ या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
  • 01140 विशेष मडगाव येथून २५ऑगस्ट.२०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
  • गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

पुणे – कुडाळ विशेष (६ सेवा)

  • 01141 विशेष पुणे येथून २३ ऑगस्ट २०२२, ३०ऑगस्ट.२०२२ आणि ६.सप्टेंबर २०२२ रोजी ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01142 विशेष कुडाळ येथून दि. २३ ऑगस्ट २०२२, ३०ऑगस्ट.२०२२ आणि ६ सप्टेंबर२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबेल : लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
  • गाडीची स्थिती : १५ तृतीय वातानुकूलित, ३ शयनयान

पुणे – थिविम/कुडाळ – पुणे विशेष (६ सेवा)

  • 01145 विशेष पुणे येथून २६ऑगस्ट २०२२, २सप्टेंबर २०२२ आणि ९सप्टेंबर २०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
  • 01146 विशेष कुडाळ येथून २८ऑगस्ट २०२१, ४सप्टेंबर.२०२२ आणि ११ सप्टेंबर२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड (फक्त 01145 साठी), थिवि (फक्त 01145 साठी)
  • गाडीची स्थिती :एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

konkan railway 1

पनवेल – कुडाळ/थिवि – पनवेल विशेष (६ सेवा)

  • 01143 विशेष ट्रेन पनवेल येथून २८ऑगस्ट २०२२, ४ सप्टेंबर.२०२२ आणि ११ सप्टेंबर२०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01144 विशेष ट्रेन थिविम येथून २७ ऑगस्ट२०२२, ३सप्टेंबर२०२२ आणि १०सप्टेंबर२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबणार : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ (फक्त 01144 साठी), सावंतवाडी रोड (फक्त 01144 साठी)
  • गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

konkan railway 2

मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (१६ सेवा)

  • 01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १३ ऑगस्ट २०२२ ते २० ऑगस्ट २०२२ (८ सेवा) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  • 01138 विशेष सावंतवाडी रोड येथून १३ ऑगस्ट २०२२ ते २० ऑगस्ट २०२२ (८ सेवा) दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा)

  • 01139 विशेष नागपूर येथून १३ ऑगस्ट २०२२, १७ ऑगस्ट २०२२ आणि २० ऑगस्ट २०२२ (३ सेवा) रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
  • 01140 विशेष मडगाव येथून १४ ऑगस्ट २०२२, १८ ऑगस्ट २०२२ आणि २१ ऑगस्ट २०२२ (३ सेवा) रोजी रोजी १९.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

पुणे – कुडाळ विशेष (2 सेवा)

  • 01141 विशेष गाडी १६ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथून ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01142 विशेष १६.८.२०२२ रोजी कुडाळ येथून १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.

पुणे-थिविम/कुडाळ-पुणे विशेष (४ सेवा)

  • 01145 विशेष पुणे येथून १२ ऑगस्ट २०२२ आणि १९ ऑगस्ट २०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
  • 01146 विशेष कुडाळ येथून १४ ऑगस्ट २०२२ आणि २१ऑगस्ट२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

पनवेल – कुडाळ/थिविम – पनवेल विशेष (४ सेवा)

  • 01143 विशेष पनवेल येथून १४ ऑगस्ट २०२२ आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01144 विशेष थिविम येथून १३ ऑगस्ट २०२२ आणि २० ऑगस्ट२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विशेष गाड्या

  • 01153 ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ (३० सेवा) पर्यंत दररोज २२.१५ वाजता सुटेल आणि ठोकूर येथे दुसऱ्या दिवशी १६.३० वाजता पोहोचेल.
  • 01154 ही विशेष गाडी दिनांक १४ ऑगस्ट २०२२ ते १२ सप्टेंबर २०२२ (३० सेवा) दरम्यान ठोकूर येथून दररोज १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
  • 01165 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (४ सेवा) पर्यंत दर मंगळवारी ००.४५ वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.
  • तर 01166 विशेष १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (४ सेवा) पर्यंत दर मंगळवारी मंगळुरु जंक्शन येथून २२.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता पोहोचेल.

मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष गाड्या

मुंबई सेंट्रल येथून मंगळवारी २३, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ठोकूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ठोकूरहून मुंबई सेंट्रलकरिता बुधवार, २४ आणि ३१ ऑगस्ट तसेच ७ सप्टेबर रोजी रात्री १०.४५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ७ वाजता पोहोचेल.

Konkan

मुंबई सेंट्रल – मडगाव जं. – मुंबई सेंट्रल (मंगळवारव्यतिरिक्त दररोज) विशेष गाड्या

मुंबई सेंट्रल येथून २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १२ वाजता ही गाडी सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत बुधवारव्यतिरिक्त दररोज सकाळी ९.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटेपूर्वी १ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

वांद्रे – कुडाळ – वांद्रे साप्ताहिक विशेष गाडी

गुरुवारी, २५ ऑगस्ट आणि १ तसेच ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी शुक्रवारी, २६ ऑगस्ट, २ आणि ९ सप्टेंबरला सकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि रात्री साडेनऊ वाजता वांद्रे येथे पोहोचेल.

konkan railway

गणेशोत्सवासाठी विशेष मेमू सेवा

  • 01157 मेमू
    दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२ पर्यंत, दि. २७.८.२०२२ ते ०५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) रोहा येथून दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.
  • 01158 मेमू
    चिपळूण येथून दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२, दि. २७.८.२०२२ ते ५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) पर्यंत दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
  • असे असतील थांबे :
    माणगांव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेकडून दिला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.