मुंबईत चेंबूर सर्वाधिक प्रदूषित

106

मुंबईतील गारठा वाढल्यानंतर वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. चेंबूर येथील वाढते वसाहतीकरण आणि कंपन्यांतील चिमण्यांमधून बाहेर पडणा-या धूरामुळे परिसरातील धूलिकण आणि सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफर या केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या ऑनलाईन प्रणालीत करण्यात आली आहे. चेंबूरमधील वाहतुकीची कोंडी तसेच कंपन्यांच्या वाढत्या संख्येमुळे सायंकाळच्या वेळी धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याने मंगळवारी धूलिकणांचे प्रमाण ३६३ प्रति क्युबिक मीटर तर अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३६३ प्रति क्युबिक मीटरवर पोहोचल्याची नोंद सफरमध्ये झाली.

मुंबईत सध्या सायंकाळच्या प्रवासात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी वायूप्रदूषणात भर टाकत आहे. चेंबूरपाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, माझगाव, कुलाबा आणि नवीमुंबईतील हवा खराब होत आहे. या भागांत प्रवास करताना एन-९५ मास्क तोंडावर लावण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. थंडीच्या मोसमात वातावरणात धूलिकणांचे प्रमाण वाढते. अशावेळी प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक असते. घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडावर एन-९५ मास्क वापरणे, घरातील खिडक्या तसेच जमीन काही कालांतराने सतत ओल्या फडक्याने पुसणे आवश्यक असते.

मंगळवारी नवीमुंबई, मुंबईतील विविध स्थानकांतील अतिखराब स्थानके – प्रति क्युबिक मीटरमध्ये

  • नवी मुंबई – ३६८
  • चेंबूर – ३६३
  • माझगाव – ३५६
  • कुलाबा – ३०८
  • वांद्रे-कुलाबा संकुल – ३१२
  • अंधेरी- ३१९
  • कुलाबा – ३०८
  • भांडुप येथे सूक्ष्म धूलिकणांचा दर्जा २७२ प्रतिक्युबिक मीटर नोंदवण्यात आला. या भागातील हवेचा दर्जा खराब होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.