काल पासून म्हणजेच मंगळवार ४ जुलै पासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. याचा काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेवाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरु आहे. अशातच येत्या तीन ते चार दिवसांत म्हणजेच ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झालं आहे. त्यामुळं सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.
(हेही वाचा – वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह)
अशातच आता सततच्या पावसामुळे चेंबुरमध्ये बिल्डिंग समोरील रस्ता खचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वसंत दादा पाटील इंजिनियर महाविद्यालयासमोरील समोरील राहूल नगर येथील एसआरए इमारतीसमोरील रस्ता खचला आहे. या खचलेल्या खड्ड्यात जवळपास ४० ते ५० वाहनं पडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही चार चाकी गाड्यांचा देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर तेथील आजुबाजूच्या बिल्डिंगमधील लोकांना बाहेर काढून इमारती खाली करण्यात आल्या आहेत. सध्या घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल आणि पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community