Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी थांबवणार कि नाही; छगन भुजबळांचा विधानसभेत प्रश्न

227
Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी थांबवणार कि नाही; छगन भुजबळांचा विधानसभेत प्रश्न
Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी थांबवणार कि नाही; छगन भुजबळांचा विधानसभेत प्रश्न

ज्या जरांगेचा (Manoj Jarange) उल्लेख सीएम करतात, ते धमक्या देतात. शिव्या देतात. मला धमक्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याखाली बसून ते मुख्यमंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांना शिव्या देतात. जरांगेंची(Manoj Jarange) दादागिरी सुरू असून ती थांबवणार कि नाही, असा प्रश्न छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) त्यांनी विधानसभेत विचारला. विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर छगन भुजबळ बोलत होते.

(हेही वाचा- Maratha Reservation : मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाल उधळून आनंद व्यक्त; जरांगेंची मात्र हटवादी भूमिका )

अजित दादांनी न बोलण्याचा इशारा करूनही बोलले

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलायला देण्याची मागणी केली. भुजबळांनी माईकचे बटण दाबून ठेवले होते. शेजारी बसलेले विखे पाटील यांनी माईक बंद केला. भुजबळांनी परत माईक सुरू केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ‘बोलू नका’असा इशारा भुजबळांना केला. तरीही भुजबळ माईक सुरु करुन बोललेच.

छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, माझे आंदोलन संपणार नाही, असे ते सांगतात. याचा अर्थ उपोषण थांबवणार नाही. दादागिरी थांबवणार नाही, हे दिसून येते.

या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळांना उत्तर दिले. ‘तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. यावर शासनाने योग्य ती कार्यवाही करावी’, असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.