मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याची दाखल केली होती. (OBC Reservation) आता याचिकेच्या सुनावणी दरम्यान मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असून भुजबळ हे वकिलांशी संवाद साधणार आहेत.
गेल्या काही मराठा आरक्षणावरून राजकारण तापले असतांना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीमधून मराठा समाजास आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली आहे. अशातच मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनीही ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा, ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करा, अशी मागणी बाळासाहेब सराटे यांनी केली होती. (OBC Reservation)
(हेही वाचा – Olympic Hockey Qualifiers : पॅरिस ऑलिम्पिकसाठी हॉकी पात्रता स्पर्धा रांचीत होणार )
काय आहे याचिका
राज्यातील ओबीसींना जे आरक्षण दिलेले आहे, ते घटनाबाह्य असून त्यामध्ये 1994 ला जीआर काढून ओबीसी आरक्षणात 16 टक्के वाढ करण्यात आली. ती घटनाबाह्य असल्याचे बाळासाहेब सराटे यांनी याचिकेत नमूद असल्याचे सांगितले. तो जीआर रद्द करणे आवश्यक आहे. 2001 चा कायदा 2004 ला पारित झाला होता. तो कायदा देखील रद्द करावा, अशी मागणी बाळासाहेब सराटे यांनी केली आहे.
या याचिकेवर आज सुनावणी असून या सुनावणीसाठी मंत्री छगन भुजबळ हे स्वतः उपस्थित रहाणार आहेत. (OBC Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community