Chhatrapati Sambhaji Maharaj यांचा इतिहास शाळेत का नाही शिकवला?; माजी क्रिकेटपटूचा थेट प्रश्न

मोगलांचा इतिहास शिकवला गेला; मात्र Chhatrapati Sambhaji Maharaj शिकवले का गेले नाहीत, असा प्रश्न आकाश चोप्रा यांनी उपस्थित केला आहे.

80

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि त्यांचा हिंदु धर्मासाठीचा अतुलनीय त्याग ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दाखवला आहे. या चित्रपटाची देशभर चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्य, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाने (Aurangzeb) त्यांच्यावर केलेले अत्याचार चर्चेत आले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांचे अतुलनीय शौर्य आणि त्याग यांचा इतिहास या निमित्ताने नव्या पिढीला कळत आहे. औरंगजेबावरून नाव पडलेले औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर केले, त्याला आता समर्थन मिळू लागले आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन थांबवण्याचीही मागणी केली जात आहे.

(हेही वाचा – अखेर JNU तील मराठी अध्यासनाला मुहूर्त मिळाला; कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी होणार उद्घाटन)

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनेही या वेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शिकवला गेला नाही; म्हणून खेद व्यक्त केला आहे. मोगलांचा इतिहास शिकवला गेला; मात्र संभाजी महाराज शिकवले का गेले नाहीत, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

अकबर एक महान, न्याय ,सम्राट कसा?

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याने म्हटले आहे की, “आज ‘छावा’ पाहिला… शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची अविश्वसनीय कहाणी… शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही शिकवलं गेलं नाही? कुठेही उल्लेख नाही, हा खरा प्रश्न आहे. अकबर एक महान, न्याय ,सम्राट कसा? हे आम्हाला शिकवलं गेलं आणि दिल्लीत औरंगजेब रोड (aurangzeb road delhi) नावाचा एक रस्तादेखील आहे… हे का, कसं घडलं?”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.