गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद सुरु होते. अशातच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. त्यानुसार औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे नाव करण्यात आलं आहे. राज्य सरकारने शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी राजपत्र प्रकाशित करुन दोन्ही जिल्ह्यांची नावं अधिकृतपणे बदलली.
त्यामुळे आता इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) असणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला होता.
(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप)
मात्र आता सरकारच्या याच निर्णयाला पुन्हा एकदा नव्याने आव्हान देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात नव्याने (Chhatrapati Sambhaji Nagar) आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयात शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सरकारच्या निर्णयाला (Chhatrapati Sambhaji Nagar) आव्हान देणारी ही याचिका मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आली. खंडपीठाने या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी घेऊ, असे स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community