Chhatrapati Sambhaji Nagar: धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

129
Chhatrapati Sambhaji Nagar: धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar: धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट डिझायर कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

दरम्यान अपघातत मृत्यूमुखी पडलेले तिघेही बजाज नगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे  . हे तिन्ही पीडित कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना हा अपघात झाला आहे. अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.