गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद सुरु आहेत. या दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलली असली तरीही न्यायालयाने या नामांतराला मंजुरी दिलेली नाही. अशातच आता राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे नाव करण्यात आलं आहे. राज्य सरकारने काल म्हणजेच शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी राजपत्र प्रकाशित करुन दोन्ही जिल्ह्यांची नावं अधिकृतपणे बदलली आहे.
त्यामुळे आता इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानावर खेळाडूंसाठी शीतपेयं घेऊन येतो)
मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणी (Chhatrapati Sambhajinagar) दरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही असं सांगितलं होतं. पडताळणी झाली नसताना तुम्ही नावं कशी बदलली अशी विचारणा हायकोर्टाने केली. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. ही प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही विचार करु असं सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर सरकारकडून (Chhatrapati Sambhajinagar) राजपत्र जारी करण्यात आलं. त्यानुसार आता उस्मानाबाद आणि औरंगाबाद या संपूर्ण जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community