महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra HSC Results Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.inया वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. (Chhatrapati Sambhajinagar)
राज्यातील एकमेव विद्यार्थिनी
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. (Chhatrapati Sambhajinagar)
१०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद
राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यावेळी गोसावी म्हणाले की, “वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे.” (Chhatrapati Sambhajinagar)
हेही पहा –