Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञ समिती

91
Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञ समिती
Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञ समिती

मालवण तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) राजकोट येथे नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राज्य सरकारने त्याच जागी नवा पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीष म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत नौदल अधिकाऱ्यांसह आयआयटी तज्ज्ञ, वास्तू विशारद, इतिहासकार आदींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने आक्रमक होत या घटनेच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknaath Shinde) यांनी बुधवारी रात्री घेतलेल्या बैठकीत राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा पुन्हा नव्याने उभारण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने समिती गठीत केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

(हेही वाचा – चर्चेची वेळ संपली, कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांनी पाकिस्तानला सुनावले)

या समितीच्या सदस्य सचिवपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीत सदस्य म्हणून नौदलाचे प्रतिनिधी कमोडोर एम. दोराईबाबू, आयआयटी तज्ज्ञ प्रा. जांगीड, प्रा. परिदा, जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर मुंबईचे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज आणि मराठा आरमाराचे अभ्यासक राजे रघुजी आंग्रे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर इतिहासकार जयसिंगराव पवार हे समितीचे विशेष निमंत्रित आहेत. या समितीवर किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाचा वाव, संकल्पना आणि कार्यपद्धती निश्चितीसाठी शिफारस करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिफारशी करण्याचे काम सत्वर हाती घेऊन समितीने तात्काळ अहवाल सादर कारावा, असे आदेशात म्हटले आहे.

चौकशीसाठी तांत्रिक समिती गठीत

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटी तज्ज्ञ प्रा. जांगीड, प्रा. परिदा यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी कारणमीमांसा शोधणे आणि दुर्घटनेमागील दोषी निश्चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. या तांत्रिक समितीला विहित कालमर्यादा न देता तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.