Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरकडे रवाना ; सातारा मुक्काम संपला

39
Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरकडे रवाना ; सातारा मुक्काम संपला
Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरकडे रवाना ; सातारा मुक्काम संपला

तब्बल 7 महिने शिवभक्तांच्या साक्षीने साताऱ्यात प्रदर्शित करण्यात आलेली ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe) अखेर नागपूरकडे (Nagpur) रवाना झाली आहेत. 19 जुलै 2024 रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात परत आणलेली ही अमूल्य ऐतिहासिक वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) संग्रहालयात ठेवण्यात आली होती. या ऐतिहासिक वाघनखांचे 4 लाख 30 हजारांहून अधिक शिवप्रेमींनी (Waghnakhe) दर्शन घेतले. (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe)

हेही वाचा-केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार; Shambhuraj Desai यांचे विधान

आज (2 फेब्रु.) सकाळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या वाघनखांना नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात आले. ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe)

हेही वाचा-Nashik-Gujarat Highway वर खाजगी बस कोसळली 200 फूट खोल दरीत; 7 जण जागीच ठार

शिवरायांच्या वाघनखांचं लंडनहून भारतात आगमन झालं. गेली सात महिने ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता साताऱ्यात होती. आता वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम संपला असून आता नागपुरच्या मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात येत आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe)

वाघनखांचा प्रवास ‘असा’ असेल
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे होती, ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईमध्ये वाघनखांचे जतन केले जाईल. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टाेबर 2025पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.